सिंधी शेतशिवारात वीज पडून बैलाचा मृत्यू
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : सिंधी तालुका राजुरा येथे आज दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज कोसळून शेतकऱ्याचा बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर रामचंद्र बोराडे यांच्या शेतशिवारात अचानक वीज पडली. त्यात त्यांचा बैल जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी मॅडम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सिंधी येथील उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी केली आहे.
स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांनी प्रशासनाने त्वरीत मदत करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बातमी संकलन : प्रवीण चिडे, विरूर (स्टे)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत