शेतक-यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रास्ता रोको
साखळी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही आंदोलन बेदखल
जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी/मोर : "अन्नदाता" धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी /मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या विद्यमानाने. अर्जुनी/मोर तालुक्यातील शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्या करीता. निवेदन देण्यात आले होते मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदनातून दिला होता
शासनाने खरेदी चे उद्दिष्टे वाढवून खरीप हंगामाची उरलेली धान खरेदी करावी.आदिवासी महामंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशन यांचे धानाची देयक लवकरात लवकर 31 मार्च च्या आधी शासनाने द्यावे .
मका खरेदी केंद्र सुरू करावे.
धान खरेदी अजूनही पूर्णपणे न केल्याने आणि त्यांचे देयक पूर्णपणे न दिल्याने आणि शेतकरी 31 मार्चला कर्जभरू शकत नसल्याने आणि आधीच सरकार ने 30जुन पर्यंत बॅक शेतक-यांना कर्ज वसुली साठी दबाव आणु शकत नाही. असे पत्रक असल्याने... याकारणानी 31 मार्च ला कर्ज न भरु शकणाऱ्या शेतक-यांना बॅकेनी थकीत करू नये.
धानाला बोनस जाहीर करावा.
- शेतीला विद्युत पुरवठा 16 तास करावा.शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन पूर्ववत देणे सुरू करावे.
- बाजार समितीचे मार्केटिंग यार्ड सुरू करून भावांतर योजना सुरू करावी.
- सरसकट कर्ज माफी करुन सातबारा कोरा करावा.
- 2019 मधील महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन पर रासी मधील 50000 उरलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आत द्यावे.
- रब्बी हंगाम धान आणि मका ईपिक पाहणी सुरू करून सातबारा ऑनलाइन पोर्टल सुरू करावे.
सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तालुका अर्जुनी मोर यांना दि गोंदिया सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक यांनी दोन टक्के गाळा रक्कम दिली ती 2% गाडा रक्कम त्यांनी 23- 24 आणि 24- 25 च्या स्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या नावे कर्जावर चढविले ती वापस पूर्ववत करण्यात यावे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना न्याय द्यावा आणि 30 सप्टेंबर 2025 पासून थकीत कर्जावरील संस्थांचे व्याज बँकेने बंद करावे.
अर्जुनी/मोर ते माहूरकुडा रस्ता दयनीय अवस्थेत त्याला तात्काळ निधी द्यावे.
जिल्हा परीषद गोंदिया यांनी अर्जुनी/मोर तालुक्यातील पाणी वाटप संस्था सुजल सामाजिक बहुउद्देशिय संस्था नवेगांव/बांध ही 1 एप्रील 2026 पासुन पाणी कनेक्शनचे दर वाढवीत आहे.हे आम्हाला अमान्य आहे.आधीच या संस्थेचे दर खुप जास्त असुन पुन्हा दर वाढवीत आहेत.मागील दरानेच पाणी कनेक्शन दयावे.
या मागण्यांच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयासमोर 16/03/2026 सोमवारला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात तहसिदार यांच्या मार्फंत आपणाला निवेदन भव्य शेतक-यांच्या समक्ष देण्यात आले होते त्या समस्यांचे निराकरण न झाल्याने अर्जुनी मोर तहसील कार्यालयासमोर दिनांक 15/04/2026 पासुन साखळी उपोषन सुरु करण्यात आले आले असून दिनांक 21 एप्रिल या सातव्या दिवशी सुद्धा या आंदोलनाची कोणाकडून दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करा अन्यथा त्याचे रुपांतर आमरण उपोषण करुन रस्ता रोको, तहसील कार्यालयाला घेराव आणी गरज पडल्यास रेल्वे रोको करण्यात येणार आहे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना तहसीलदार अर्जुनी मोर निवेदन देण्यात आले अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष ललित कुमार बाळबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत