Breaking News

महारोगी सेवा समिती संचालित निजबल प्रकल्पा अंतर्गत शिक्षक मार्गदर्शक कार्यशाळा

 महारोगी सेवा समिती संचालित निजबल प्रकल्पा अंतर्गत शिक्षक मार्गदर्शक कार्यशाळा

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : महारोगी सेवा समिती संचालित निजबल प्रकल्पाअंतर्गत शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दि.७ जानेवारीला निजबल प्रकल्पाचे सभागृहात करण्यात आले होते.

     शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी ,मार्गदर्शिका प्रा.मंजिरीताई धामणकर ह्या होत्या.कार्यशाळेत लेखक कवी दीपक शिव सर,संधिनिकेतन अपंगाच्या कर्मशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगींटवार ,अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर,आनंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका विद्याताई गोखरे (टोंगे) आदि आनंदवनातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

 कार्यक्रमात विशेष मार्गदर्शिका मंजिरीताई धामणकर यांनी संवाद कौशल्य विषयाचे माध्यमातून उत्तम संवाद ,शब्दांचा खेळ,मोजक्या,नेमक्या,

नेटक्या शब्दात आपले बोलणे स्पष्टपणे रंजकतेंने मांडणे,कमीत-कमी शब्द,जास्तीत-जास्त आशय कसा सांगायचे वेगवेगळे उदाहरण देऊन शिक्षकांनी शिकविले पाहिजे.तसेच वर्तमानपत्राबाबत मंजिरीताई म्हणाल्या की,पूर्वी भाषेचा दर्जा फार चांगला असायचा 'गावात राडा' मोठ्या समुदायापर्यंत पोहचला .परंतु 'राडा ' हा शब्द नेटका नाही.बोलण्याचे तत्वज्ञान म्हणजे स्पष्टपणे उच्चार असले पाहिजे त्यामध्ये रंजकता असली पाहिजे .शिक्षक मुलांना आवडत असते कारण मुलांचे रंजन होत असते.आवाज,भाषा,वाणी ,उच्चार,बोलणे ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे.तसेच त्यांनी मार्गदर्शन करतांना पंचपदी- अ आ ओ ओं म व तरंग-ओ ओं म याबद्दल सांगितले आहे.२८ वर्ष निवेदन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंजिरीताई धामणकर यांची लिम्का बुकात नोंद मराठी ,हिंदी,उर्दू,इंग्रजी,संस्कृत, बंगाली,अवगत असलेली निवेदिका गेली २८ वर्ष निवेदन क्षेत्रात कार्यरत आहे."चर्पटमंजिरी" या एकपात्री कार्यक्रमाचे देश-विदेशात ७०० हून अधिक प्रयोग.पाच पुस्तके प्रकाशित,१२ पुस्तकांची भाषांतरकार,बहिशाल व्याख्याती,सूत्र संचालन,संभाषण कला,भाषा समृद्धी,हिंदी संभाषण प्रशिक्षक,अनेक पुरस्कार प्राप्त,लिम्का बुक मध्ये नोंद असणाऱ्या मंजिरीताई धामणकरने शिक्षक कार्यशाळेत शिक्षकांना पोषक असे मार्गदर्शन केले. दोन शिक्षकांमध्ये संवाद कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या शिक्षकांमधून दोन व्यक्तिमत्वाने एकमेकांशी परिचयाचे माध्यमातून संवाद साधण्याचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्याध्यापक विजयजी भसारकर सरांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत