Breaking News

टिप्परची कारला धडक, टेमुर्डा हुडकी जवळील घटना

 जखमींना पुढील उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर ;- वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस चे आणि विद्यमान नगरसेवक दिपक जयस्वाल नागपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा या गावाजवळ चंद्रपूर चे व्यावसायिक हे आपल्या चारचाकी वाहन क्र. एम एच 34 बी आर 6886 ने नागपूरवरून काम आटोपवून चंद्रपूरला येत असताना टेमुरड्याजवलील हुडकी पेट्रोल पंप येथे एक भरधाव टिप्पर वेगात आल्याने त्या वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जयस्वाल यांच्या वाहनाने दुभाजकाला धडक दिली.या अपघातामध्ये दिपक जयस्वाल यांचे वाहन चालक उद्धव बनसोड यांच्या डोक्याला जखम झाली.तर यात दीपक जयस्वाल किरकोळ जखमी झाले.

 दीपक जैस्वास्ल यांच्या वाहनाने दुभाजकाला धडक दिल्यावर बाजूने जाणारे दुचाकी स्वार रमेश जेणेकर पीजदूरा हे ही किरकोळ जखमी झाले जखमींना पुढील उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत