Breaking News

मंत्रालयात ओळख सांगून हॉटेल मालकाला ४१ लाखांचा चुना!

 मंत्रालयात ओळख सांगून हॉटेल मालकाला ४१ लाखांचा चुना!


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) औरंगाबाद : आपण मोठ्या केटरर्सचे मालक असून मंत्रालयात ओळखी आहेत, तसेच तुम्हाला राज्यभरातील मोठमोठ्या शहरातील कोविड रुग्णालयाला जेवण पुरविण्याचे काम देतो म्हणत महिलेसह तिचा कथित पती, अन्य एक अशा औरंगाबाद, मुंबई, नाशिकमधील तिघांनी औरंगाबादेतील हॉटेलला तब्बल ४१ लाख ५ हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला.

भक्तबंधू पाढी (५२, रा. अहिंसानगर, आकाशवाणी) यांच्या फिर्यादीवरुन तिघा आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रजनी रानमारे (४३, रा. फ्लॅट ए-४, अवंतिका अपार्टमेंट, प्रतापनगर दर्गा रस्ता, औरंगाबाद), कथित आरोपी पती संदीप बाबुलाल वाघ (४७, रा. फ्लॅट १०२, बी-१, लोक निसर्ग, मुलूंड पश्चिम), स्वप्नील भरत नांद्रे (२४, रा. बालाजी रो हाऊस नं. २, उदय कॉलनी, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत