मंदिरात प्रवेश करत नारळ फोडल्याने संपूर्ण समाजावर बहिष्कार, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
मंदिरात प्रवेश करत नारळ फोडल्याने संपूर्ण समाजावर बहिष्कार, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) लातूर : मंदिरात जाऊन एका मागासवर्गीय तरूणाने देवाचे दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस संपूर्ण समाजावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या ताडमुगली गावात ही घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हे बहिष्काराचे प्रकरण मिटले आहे. मात्र यातून समाजात आजही जातिपातीच्या भिंती मिटत नसल्याचे चित्र उभे राहत आहे, ते कसे मिटनार हाच खरा प्रश्न आहे.
ताडमुगळी गाव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळील हे गाव आहे. तीन दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील तरुण मुलाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तनावपूर्ण स्थिति निर्माण झाली होती मागासवर्गीय समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही प्रथा गावात होती. ही प्रथा मोडल्यामुळे समाजात तेढ निर्माण झाला. यामुळे गावातील संपूर्ण मागासवर्गीय सामाजावर बहिष्कार टाकण्यात आला.
किराणा दुकान, दळण बंद
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या समाजासाठी गावातील किराणा दुकान तसेच दळण बंद केले. शेतातील मजूरीसाठी बोलावने बंद करण्यात आलं. दोन दिवसांत याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला. सर्वाशी चर्चा करत प्रकरण तुर्तास तरी मिटवले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत