Breaking News

क्रिष्णा नदीच्या काठी आईसोबत सरपण गोळा करायला गेलेल्या दोन चिमुकल्यांची कृष्णा नदीत समाधी

क्रिष्णा नदीच्या काठी आईसोबत सरपण गोळा करायला गेलेल्या दोन चिमुकल्यांची कृष्णा नदीत समाधी 

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क)  नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गणेशपूर नावाचं गाव आहे. या गावात रूस्तम खान राहतात. रिजवान (वय अकरा वर्षे) हा त्यांचा भाचा व इमामुल (वय आठ वर्षे) खान हा त्यांचा मुलगा दोघेही इमामुलच्या आईसोबत सरपण गोळा करायला गेले. काही वेळ दोघांनीही मदत करून लागली. सोमवारी दुपारची घटना. संबंधित महिला कृष्णा नदीच्या परिसरात सरपण गोळा करत होती. काही वेळात रिजवान आणि इमामुल हे दोघेही बाजूलाच असलेल्या क्रिष्णा नदीच्या काठावर गेले. नदीतील पाणी पाहून तिथं खेळायला लागले. नदीत पाणी खोल असल्याची त्यांनी कल्पनाच आली नाही. पाण्यात खेळत असताना दोघेही बुडाली. दोघांचेही कपडे नदीच्या बाजूलाच होते.

हेही वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे नवरदेवाचं 'हनिमून' लॉकअपमध्ये

मुलांनी सोबत येण्याचा केला होता हट्ट इकडे इमामुलच्या आईने बालकं दिसत नाही म्हणून शोध घेतला. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे दिसले. त्यावरून ही मुलं नदीत उतरली असावीत, असं तिला वाटलं. तिचा जीव कासावीस झाला. मुलांना येऊ नको, असं तीनं घरीच म्हटलं होतं. पण, मुलांनी हट्ट केला. शिवाय घरी मुलं कुणासोबत वेळ घालवणार हा प्रश्न होताच. दोन्ही मुले लहान होती. त्यांना पोहता येत नव्हते. गंमत म्हणून पाण्यात उरतले असावेत. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. लहान मुलांना सोबत घेऊन जाताना त्यांच्या आईवडिलांना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशाप्रकारच्या घटना होण्यास वेळ लागत नाही.

हेही वाचा : घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला

दोघांचेही मृतदेह बाहेर काढले पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व एमआयडीसीचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका मुलाला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या मुलालाही बाहेर काढण्यात आले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

हेही वाचा : देशाचा मानबिंदू ठरणाऱ्या वन अकादमी च्या कामात दिरंगाई नको : आ. सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत