Breaking News

नागपूर : तहसीलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जणांना अटक

 नागपूर : तहसीलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जणांना अटक


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या तनवीर गेस्ट हाऊसच्या चौथ्या माळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तहसील पोलिसांनी रविवारी (ता.६) रात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी १६ जणांना अटक केली. ही सर्व मोठे जुगार खेळणारे असल्याची माहिली असून पोलिसांनी ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


मोहम्मद असलम, मोहसीन अन्सारी, मोहम्मद जावेद, मोहम्मद सोहेल, अबू हुरयरा, मोहम्मद साहिद, रिझानू रेहमान, अबू दाऊद, इरशाद अहमद, नौशाद अन्सारी, मोहम्मद शाकीर, इजाज अन्सारी, मुनिब अन्सारी, सगीर अहमद, मोहम्मद नियाज आणि मेराज अहमद अशी अटक करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलमध्ये असलेल्या तनवीर गेस्ट हाऊसमधील रुम क्रमांक सातमध्ये मोठा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


यावरुन रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी तनवीर गेस्ट हाऊससमोर सापळा रचला आणि जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी रुम क्रमांक सातमध्ये १६ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जवळपास ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून येथे जुगार भरविण्यात येत होता. ही कारवाई पोलिस उपायुक्त गजाजन राजमाने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत