Breaking News

महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती राज्य संघटक मीडिया प्रमुख पदावर संतोष रोकडे यांची वर्णी

 महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती राज्य संघटक मीडिया प्रमुख पदावर संतोष रोकडे यांची वर्णी

अर्जुनी-मोर : महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना समिती यांची दिनांक 13 फरवरी रोजी जळगाव येथे सभा झाली सभेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना समिती संघटक मीडिया प्रमुख म्हणून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील संतोष रोकडे यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक यांनी अभिनंदन केले आहे या पदावर निवड झाल्याने ग्रामरोजगार सेवकांच्या हितासाठी सदोदित कार्य करत राहू असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना संतोष रोकडे यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत