Breaking News

भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा अपघाती मृत्यू

भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा अपघाती मृत्यू


गोंडपिपरी :   भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा अपघाती मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ता माजी ग्राम पंचायत सदस्य यांचा २ तारखेला बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अपघात झाला त्यात ते जबर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

तळोधी येथील रहिवासी संतोष ताजने आपल्या दुचाकीने सहकारी विलास कत्रोजवार यांच्यासोबत गोंडपिपरीवरून तळोधीला जात होते. चेक विठ्ठलवाड्या जवळ काम सुरू होते. मात्र याची माहिती नसल्याने अंदाज न आल्याने गाडी घसरून पडली. यात संतोष ताजने गंभीर जखमी झाले. लगेच त्यांना उपचारासाठी चंद्रपूर हलवण्यात आले. मात्र आज ३ तारखेला सेवाग्राम ला उपचाराकरिता नेताना दुपारी ४ च्या दरम्यान, त्यांची प्राण ज्योत मावळली.

विठ्ठलवाडा ते पोडसा रस्त्याचे काम सुरू असून त्याठिकाणी कसलेही दिशा दर्शक फलक, सूचना फलक न लावल्याने दुदैवी अपघात झाला. असा आरोप करत गावकऱ्यांनी तळोधी येथील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली. डिसीजी कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे हा मृत्यू झाला असून कुटूंबाला आर्थिक मदत करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. संतोष ताजने यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी असून गावात शोककळा व्यक्त केल्या जात आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांनी तळोधी येथे भेट दिली. यावेळी गावकन्यांनी डिसीजी कंपनीने ताजने कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. अन्यथा गावकरी व शिवसेना उद्या रस्त्यावर उतरणार असा ईशारा शिवसेना नेते संदिप करपे यांनी दिला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत