महीला मानव समाजाचा अविभाज्य अंग - सु.मो.भैसारे
महीला मानव समाजाचा अविभाज्य अंग - सु.मो.भैसारे
जागतिक महिला दिन समारोह संपन्न
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे,गोंदिया : जि. प.वरीष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे जागतिक महिला दिन समारोह महिला शिक्षिकेचा सत्कार करून संपन्न झाला.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण करताना , पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे म्हणाले की, सनातनाच्या पारंपरिक रूढी-परंपलेला छेद देत , जगातील महिला कामगार एकवटल्या व न्यायिक हक्कासाठी लढा दिला.स्त्रिया सुद्धा समाजाचा अविभाज्य अंग असून, त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे कमी लेखता कामा नये. महिलांनी सुद्धा पुरुषांप्रमाणे विविध क्षेत्रात केलेली मोलाची कामगिरी अतिशय व्याखण्यासारखी आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजमनावर कोरून स्वतःला सिध्द करून दाखविले आहे. पुढे स्त्रिबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणाले की,
" कोमल हूं, कमजोर नहीशक्ति का रूप, नारी हैजग को जीवन, देनेवालीमौत भी तुमसे, हारी है ।"
१११११
याप्रसंगी अचला कापगते-झोडे व प्राची कागणे-ठाकूर यां महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र ठवकर तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे केले.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी मोहन नाईक, वामन घरतकर, कसक शहारे, काजल रावेकर, काशीस वाघमारे, पूनम सोनवाने, वैष्णवी सोनवाने, लीना झोडे आदींनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत