आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी केले आंदोलन
आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी केले आंदोलन
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनीधी, संतोष रोकडे,गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिनांक 28 मार्च रोजी मोर्चा करून आपल्या न्याय मागण्याचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आरोग्य विभागात कार्यरत अशा वर्कर व गटप्रवर्तक यांना बकाया कामाचा वेतन तसेच वाढीव मानधन तसेच गटप्रवर्तक यांना अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे एकत्रित वेतन देण्यात यावा व सरळ नियुक्ती द्यावी covid-19 सर्वेक्षण कामाचा जून दोन हजार वीस पासून आशा कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये व गट प्रवर्तकांना पाचशे रुपये दर महिना देण्याचा महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून आदेश दिले मात्र फक्त मे 2020 या महिन्याचा भत्ता देण्यात आला उर्वरित भत्ता देण्यात यावा सर्व आशा कर्मचाऱ्यांना 18000 व गटप्रवर्तक यांना एकवीस हजार रुपये मासिक वेतन लागू करून कर्मचारी दर्जा देण्यात यावा आरोग्यवर्धिनीच्या वेतनात कपात केलेला वेतन त्वरित द्यावा तसेच सन 2021 च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रांवर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांची नियुक्ती करण्यात आली होती इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा व गटप्रवर्तक यांना निवडणूक कामाचा वेतन द्यावा निश्चित वेतन ठरल्याशिवाय नवीन काम देण्यात येऊ नये व कामासाठी बळजबरी करण्यात येऊ नये जिल्ह्यात व तालुक्यात तक्रार निवारण समिती नियुक्त करून समितीवर कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेण्यात यावे व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत