बोनस न देणे हा शेतकऱ्यांशी धोका : माजी खा. शिशुपाल पटले
आघाडी शासना विरोधात भाजपचे आंदोलन
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम भंडारा : धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे बोनस देण्याची परंपरा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केली होती. मात्र धानाला बोनस नाकारुन आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना धोका दिल्याचा आरोप माजी खासदार व भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शिशुपाल पटले यांनी केला. भाजप किसान मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र सरकार चा निषेध करण्यासाठी आज 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र त्याला दिलासा देण्याचे धोरण सरकार राबविताना दिसत नाही. या धोरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरेन्द्र रहांगडाले, भंडारा शहराध्यक्ष संजय कुंभलकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले.
रब्बी पिकाची लागवड सुरू असल्यामुळे कृषी पंपाचे कनेक्शन कापणे थांबविण्यात यावे, कापलेले कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे, तात्काळ धानाला ७०० रु बोनस देण्यात यावा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे, धानाचे चुकारे देण्यात यावे, धडक सिंचन विहिरीचे प्रलंबित बिले त्वरित देण्यात यावेत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भंडारा शहर, जिल्हा परिषद गटनेता विनोद बांते, म नितीन कडव, मुन्ना पुंडे, गणेश कुकडे, मयूर बिसेन, देविदास कुंभलकर, कल्याणी भुरे, कुंदा वैद्य, तु.रा. भुसारी,शाम दलाल, भाष्कर निमजे, कांशीराम तेंभरे, दिनेश निमकर, जोतिष नंदनवार, रुबी चढ्ढा, विकास मदनकर, आबीद सिद्दीकी, मनोज बोरकर, मंगेश वंजारी, अमित वसानी, सचिन बोपचे, आशिष कुकडे, राजकुमार मरठे, चरण ठाकरे, श्रावण कापगते, कैलास तांडेकर, माला बगमारे, रोशनी पडोळे, मधुरा मदनकर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत