Breaking News

आष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

आष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


महा घडामोडी न्यूज प्रतीनीधी सुखसागर झाडे,चामोर्शी :  चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपा नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दि. 2४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. मृतक नामे विनोद मंगर वय ४३ वर्ष रा. मुरखळा माल ता. चामोर्शी येथील असुन मृतक हा संध्याकाळ च्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथून आपल्या दुचाकी क्र. एम एच. 33 ई 0653 या गाडीने स्वगावी मुरखळा येथे जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली असता डोक्याला जबर मारहाण लागून मेंदू बाहेर निघाल्याने तो जागीच ठार झाला.

       सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक कुंदन गावडे सह इतर पो.कर्मचारी घटना स्थळ दाखल होत पंचनामा करून  मृतकास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत