Breaking News

सामाजिक समता सप्ताहात संविधानाचे वाचन व मार्गदर्शन

सामाजिक समता सप्ताहात संविधानाचे वाचन व मार्गदर्शन

"डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी जीवन व पुस्तक प्रेम"



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,सतिश भालेराव, नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूर येथील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी मुलींच्या शाळेत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने समता सप्ताहानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवाशी शाळा, वानाडोंगरी ता. हिंगणा, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'विद्यार्थी जीवन व पुस्तक प्रेम' या विषयावर वकृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत २५ स्पर्धाकांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक ऋतुजा गजभिये, व्दितीय क्रमांक संध्या दुर्गे, तृतीय क्रमांक  आकांक्षा काळे या विद्यार्थीनीने पटकवला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात . 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून शेतकरी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेले अमूल्य योगदान' या विषयावर बार्टीचे समतादूत आणि प्रबोधनकार सतीश शामकुवर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मेडल व संविधान उद्देशिका देवून गौरवण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डी.एन. मेश्राम (दरेकर) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, यावेळी व्यासपीठावर (भालेराव करिअर व स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक) सतीश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचारांवर प्रकाश टाकत संविधानाचे वाचन व मोलाचे मार्गदर्शन केले. सहायक शिक्षक प्रियंका डांगेवार, रंजना गजाम, कौरती मॅडम, पंकज लदाडे व शाळेतील कर्मचारी सुकेशनी मेश्राम, रेखा आभारी, वैशाली येसम, माधुरीताई, सुनिता राऊत, जितेंद्र किरणापुरे, सरोज गजबे, ममता वानखेडे, अल्का गायकवाड शासकीय निवासी शाळेच्या सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत