श्री सद्गुरु लांडे महाराज यांचे उपस्थित दत्त मंदिर ढाकोरी येथे राम जन्म उत्सव साजरा
श्री सद्गुरु लांडे महाराज यांचे उपस्थित दत्त मंदिर ढाकोरी येथे राम जन्म उत्सव साजरा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, यवतमाळ : राम नवमी निमित्य श्री दत्त मंदिर ढाकोरी येथे राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील शेकडो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिथी म्हणून सेवा निवृत्त शिक्षक श्री वासाडे गुरुजी होते. कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ व आरती ने करण्यात आली सकाळी ठीक 8 वा दीप प्रज्वलन व घटस्थापना करण्यात आली यावेळेस कीर्तनकार श्री विवायकराव बोबडे महाराज श्री सद्गुरू कावळे महाराज व काल्याचे कीर्तन श्री सद्गुरू भानुदास कापसे महाराज यांनी केले. दही हंडी काला झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा उत्सव सोहळा श्री सद्गुरू लांडे महाराज यांचे उपस्थित व यांचे मार्गदर्शनात पार पडला यावेळी विनावादक श्री आनंदरावजी महाकुळकर, श्री शंकररावजी वैरागडे, नागोबाजी भोयर व प्रवचनकार श्री मधुकरराव ठाकरे, श्री नानाजी गोहणे, श्री साधुजी भट, श्री मारोतरावजी मालेकर,श्री अभिमन्यू चटके,श्री श्रावनजी सोनेकर,श्री भाऊरावजी गौरकार हे उपस्थित होते उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी ढाकोरी येथील गावकऱ्यांनी उत्तम सहकार्य केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत