शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला
शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला.
डॉ.मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन
महानगर भाजपाने साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले जयंती
महा घडामोडी न्युज नेटवर्क चंद्रपूर : मौलाना अबुल कलाम आझाद बागीच्यातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मल्यापर्ण करून महानगर भाजपा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती सोमवार(11 एप्रिल)ला साजरी करण्यात आली.यावेळी
भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,महानगर उपाध्यक्ष अरुण तिखे,डॉ.संजय घाटे,दिवाकर बनकर,किसान आघाडी अध्यक्ष रवि चहारे,रमेश खडके,स्वप्नील बनकर,रोशन जथाडे,प्रतीक बनकर,सचिन गौरकर,स्नेहित लांजेवार,अरुण चहारे,कुणाल आंबेकर,रुपेश चहारे,विपीन निंबाळकर,राकेश टेभूरकर,शुभम निंबाळकर,आकाश वानखेडे,नीरज बनकर,शुभम बनकर,सौरभ बनकर,यश बांगडे,यश बनकर,दीपक हुड,गणेश रामगुंडेवार,गिरीश पाथरीकर,अमित निंबाळकर,वैभव निंबाळकर,राहुल पाल,उमेश राजगडकर,मयूर चहारे,योगेश चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्य वेचले.विद्वेचे महत्व सांगताना त्यांनी समाजाला सांगितले की आपण जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील, ज्योतिबा फुले हे फक्त नाव नसून ते आधुनिक काळातील शिक्षणाच्या पित्याचे नाव आहे. ज्यांना वर्षानुवर्षे आठवण ठेवले जाईल, शिक्षणाचा दिव्याचा प्रकाश देणारे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे विचार क्रांती करणारे होते.ते सदैव प्रेरणादायी आहेत.असे प्रतिपादन त्यांनी केले.
ज्योतिबांनी स्त्रियांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले : निंबाळकर
युवानेते विशाल निंबाळकर म्हणाले,ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.एक मुलगी शिकली की समस्त कुटुंब शिक्षित होते,हा त्यांचा विश्वास होता.भारतीय समाजात स्त्रियांना त्यांनी सन्मानाचे स्थान मिळवून दिले.म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना स्थान प्राप्त झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत