घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासात शिक्षा
घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासात शिक्षा
अर्जूनी मोर पोलीस स्टेशनची सुपरफास्ट कामगिरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,संतोष रोकडे,अर्जुनी-मोर : अर्जुनी-मोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महागाव येथील सुर्यकांत पिल्लेवान यांच्या पोल्ट्री फार्म मधील 15 गावठी कोंबड्या चोरीला गेल्याबाबत दिनांक 16/05/2022 रोजी अर्जुनी-मोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 142/2022 भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा करण्यात आला.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढुन तसेच तांत्रिक तपास करून तात्काळ पंकज काळसर्पे राहणार महागाव या आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली.
आज रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून चोवीस तासाच्या आत आरोपीला दोषारोप पत्रासह मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सर्व प्राप्त पुराव्यांची पडताळणी करून आरोपीला 15 दिवस कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास निकालास 24 तासात पूर्ण केल्याची महाराष्ट्र पोलीस दलातील अतिशय दुर्मिळ केस आहे
या गुन्ह्याचा तपास गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री. भिसे साहेब व संकेत देवळेकर साहेब, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अंमलदार दीपक खांडेकर, गौरीशंकर कोरे, प्रवीण बहिरे, लोकेश कोसरे, श्रीकांत मेश्राम, रमेश सेलोकर, चंद्रकांत भोयर, दीक्षित दमाहे यांनी मोलाचे सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत