सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतींची गैरसोय आरोग्य विभागांचे दुर्लक्ष
सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतींची गैरसोय आरोग्य विभागांचे दुर्लक्ष
प्रहार सेवक विनोद उमरे व गावकऱ्यांचा आरोप
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर ; चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४२ गावाचा समावेश आहे येथिल आरोग्य केंद्रासाठी नविन इमारत बांधण्यात आली.नविन ईमारतीचे बांधकाम दोन वर्ष पूर्ण झाले आहे.
आता नविन सुसज्ज अशा इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात यावे जेणेकरून या परिसरातील ४२ गावातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती मात्र दोन वर्ष लोटूनही आरोग्य केंद्र नविन इमारतीत नविन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले नसल्याने आरोग्य केंद्राच्या नविन इमारतींची गैरसोय होत आहे.
सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र कडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन घानोडे, मुरलीधर, रामटेके लोकेश खामनकर नारायण मत्ते,सत्यपाल गजभे, संदीप निखाडे, नारायण निखाडे, मिलिंद खोब्रागडे यांनी केले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत