साकोलीत कँडल मार्चद्वारा तथागतास अभिवादन
साकोलीत कँडल मार्चद्वारा तथागतास अभिवादन
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, साकोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती द्वारा त्रिगुणी(वैशाख) पौर्णिमेचे औचित्य साधून(ता.१६मे) कँडल मार्चद्वारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भोजनदानाने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. त्रिगुणी पौर्णिमा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण असा त्रिगुणी संगमाचा दुर्मिळ योग आहे. स्मारक भूमी येथे ८:३० वाजता अध्यक्ष नित्यानंद मेश्राम आणि समिती पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेस मल्यार्पण व मेणबत्ती प्रज्वलित करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
बुद्ध वंदना ग्रहण करून तथागतास अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी आणि गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे महासचिव कैलास गेडाम,अमोल टेभुर्णे सामाजिक कार्यकर्ता साकोली , भिक्कुनी आर्या यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कॅन्डल मार्च सुरु करण्यात आले स्मारक समितीचे अध्यक्ष नित्यानंद मेश्राम, उपाध्यक्ष घनश्याम राऊत, सचिव ॲड. प्रभाकर बडोले व्यवस्थापक सोनू राऊत, सहसचिव मनोहर टेंभूर्णे, दादु बडोले सामाजिक कार्यकर्त्या ॲड.स्मिता मेश्राम यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढण्यात आला.
संपूर्ण साकोली शहरात भ्रमण करून स्मारक समितीचे प्रांगणात कँडल मार्च चे समापन करण्यात आले. यावेळी अमोल टेंभूर्णे, प्रमोद शिंगाडे, , हरिभाऊ शहारे, विजय साखरे, देवा इलमकार, दीपक साखरे, सुरेश राऊत, शीलादेवी वासनिक, सुनंदा रामटेके, कविता मडामे, भारती रंगारी, संगीता राऊत यांचेसह सामाजिक कार्यकर्ते व शहरातील गणमान्य व्यक्ती सहभागी झाले होते. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत