Breaking News

जि.प.शाळा, मोरगाव चा अभिनव उपक्रम

 जि.प.शाळा, मोरगाव चा अभिनव उपक्रम

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी-मोर : विदर्भात उन्हाचा वाढता तडाखा पाहता, गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने २ मे पासून जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्यात.असे असतानाही जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान नियमितपणे दोन तास स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व पूरक अध्ययन-अध्यापन कार्य करण्याचा अभिनव उपक्रम सुरू असल्याने, पालकांकडून कौतुकास्पद उद्गार काढले जात आहे.

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने २ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुरेशी संधी उपलब्ध न झाल्याने, विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यक्रम व विविध उपक्रमाचे लक्ष्य गाठणे अवघड झाले होते.सदर वस्तूस्थिती शाळा प्रशासनाने लक्षात घेता, इयत्ता पाचवी व आठवी चे शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता आठवीसाठी एन.एम.एम.एस. परीक्षाचे मार्गदर्शन व सराव वर्ग उन्हाळी सुट्टी असतांनाही नियमितपणे घेण्याचे ठरविले आहे.सदर उपक्रमास पालक वर्ग उत्स्फूर्त सहकार्य करीत आपल्या पाल्यांना नियमितपणे सकाळी८ वाजता पूरक अध्ययन वर्गात हजर करण्यात सहकार्य करीत आहेत.

    जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, गोंदियाचे अधिव्याख्याता नरेश वैद्य यांचेकडून कौतुकाची थाप

         दिनांक १७ मे२०२२ला *जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा मोरगाव येथे मा डॉनरेश वैदय अधिव्याख्याता डायट गोंदिया यांनी सकाळी ८.०० वाजता शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पालक भेटी देण्यासाठी आकस्मिक भेट दिली असता इयत्ता ५ वी चे व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस. चे उजळणी वर्ग शाळेत सुरू असल्याचे पाहून,

      डॉ नरेश वैद्य सरांनी मुख्याध्यापीका सौ रेखा गोंडाणे मॅडम, . सु. मो. भैसारे पदविधर शिक्षक, मोहन नाईक सर, पुरुषोत्तम गहाणे सर, जितेंद्र ठवकर सर या उपस्थित शिक्षकांना कौतुकाची थाप देऊन समुपदेशन केले.तसेच विध्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अर्जुनी/मोर.चे गटसमन्वयक सत्यवान शहारे शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

  काँन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद मोरगाव कडे

 शाळेत नियमित घेण्यात येणारे वर्गाध्यापन, विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, पूरक मार्गदर्शन , विविध शासकीय योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ ,तसेच विविध भौतिक परिपूर्णतेने असलेल्या सदर शाळेत ,पालकांचा कल कॉन्व्हेंट शाळेऐवजी जिल्हा परिषद शाळा मोरगाव कडे दिसून येत आहे.त्याची परिणती म्हणून सन २०२२-२३या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीत १००% विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करून घेतलेला आहे. नजीकच्या अर्जुनी/मोर.येथिल खाजगी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे स्वगावी प्रवेश निश्चित करून घेतलेला आहे.त्यामुळे शाळेची पटसंख्या सातत्याने वाढत असल्याने गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे यांनी शाळा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत