Breaking News

शेतकरी मेल्यावर जाग येईल काय महावितरण विभागाला : मंगेश तिखट

शेतकरी मेल्यावर जाग येईल काय महावितरण विभागाला : मंगेश तिखट

तक्रार दिल्यानंतरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष कारण तरी काय नेमके ?

 बंद असलेली नारंडा येथील डीपी तात्काळ सुरू करावी


महा घडामोडी न्युज नेटवर्क, कोरपना : कोरपना तालुक्यातील सुरेश गुंडावर यांच्या शेतामधील इलेक्ट्रिक पोल पडल्याने काही तार तुटली आहेत,त्यामुळे डिपी सुध्या अवघ्या तीन वर्षापासून तशीच बंद असून तो पडलेला पोल सुद्धा त्याच स्थितीत पडलेला आहे,या संदर्भात महावितरण विभागाला  अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा महावितरणचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, मात्र त्यांचे या कामाकडे लक्ष न देण्याचं कारण काय हे मात्र 3 वर्ष उलटूनही गूढ मात्र गुलदस्त्यात आहे, 

विद्युत तारे खाली लोटलेले असल्याने अनेक इलेक्ट्रिक पोल पडलेले आहेत ही बाब अतिशय धोकादायक आणि गंभीर असून जनावरे किंवा मनुष्यहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत तेव्हा याकडे विद्युत वितरण विभागाने तात्काळ लक्ष घालून ही शेतकऱ्यांची समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी अशी मागणी कोरपना महासचिव तालुका राष्ट्रवादी युवक मंगेश तिखट अशी मागणी विद्युत वितरण विभागाला केली आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत