काँग्रेसच्या दणक्याने घुग्गुस - म्हातारदेवी रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात
काँग्रेसच्या दणक्याने घुग्गुस - म्हातारदेवी रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर : घुग्गुस शहरातील राजीव रतन चौकात आर.के. मथानी या कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आलेले आहे.मात्र या कंपनीच्या बोगसपणे व ढिसाळ नियोजनामुळे राजीव रतन चौक हा अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.कंपनी तर्फे पर्यायी रस्ता,रुग्णवाहिका,वॉटर टँकर, स्वच्छता कर्मी, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच वेस्ट सिमेंट काँक्रिट मटेरियल घुग्गुस - म्हातारदेवी रस्त्यावर टाकण्यात यावे.
या करिता घुग्गु स काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यालयावर कार्यकर्त्या सह धडकले होते.एका आठवड्यात जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर कंपनीचे काम बंद पाडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने केले होता.त्या मागणीची दखल घेत कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजिण्याचे कार्य सुरू केले असून सदर कार्य हे नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत