Breaking News

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित पुर्व परिक्षा 2021मध्ये 515 अतिरिक्त जागा वाढवा

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित पुर्व परिक्षा 2021मध्ये 515 अतिरिक्त जागा वाढवा 



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित पूर्व परीक्षा 2021 मधेच 515 अतिरिक्त जागा वाढवून देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन आज दिनांक 04 / 05 / 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील साहेब यांना देण्यात आले.


यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष : भुवनेश्वर निमगडे , विधी सल्लागार : आशिष नगराळे , प्रसिद्धी प्रमुख : किरण घाटे,  जिल्हा उपाध्यक्ष : चंद्रशेखर मुरसकर , जिल्हासचिव : संजय खोब्रागडे , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष : सद्दाम अन्सारी, शहर अध्यक्ष : देविदास बोबडे , शहर उपाध्यक्ष : बशीरभाई अन्सारी , तालुका अध्यक्ष : लक्ष्मीकांत डोंगरे , फारुख शेख , रमेश फुलझेले , सत्यशील सरोदे ,   महिला आघाडी जिल्हाध्यक्ष : सौ.सविताताई खुटेमाटे , जिल्हा संघटिका : रितूताई शिंदे , आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत