Breaking News

अवैध रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या

अवैध रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,वरोरा ; वरोरा तालुक्यातील करंजी या गावात असलेल्या वर्धा नदी वर काही रेती तस्कर बोट आणि पोकलेन च्या सहाय्याने रेतीचा अवैधरित्या उपसा करीत असल्याचे प्राथमिक माहिती तहसील विभागाला देण्यात आले या तक्रारीवर तहसील कार्यालयातील चमूने पोलीस प्रशासन यांच्या मदतीने काल कारवाई करण्यात आली, यात लाखो रुपयांचे साहित्य रेती वाहतूक करणारे वाहन, अशा वस्तू सह कारवाई करण्यात आली.


नदीवरील करंजी घाटावर काही अवैध रेती तस्कर पोकलेन च्या सहाय्याने तसेच नदीमध्ये बोटी लावून सेक्शन पाईप च्या द्वारे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत असल्याचे दिसून आले वर्धा नदीच्या पूर्व बाजूस वरोरा हद्दीत रेती उपसा होत असल्याचे निदर्शनात आले या घाटात रेती उपसा करण्यासाठी असणाऱ्या 4 बोट, यांची प्रत्येकी किंमत अडीच लाख रुपये, 40 लाख रुपये किमतीच्या पोकलेन तसेच साठ लाखाचा अवैध रेतीचा उपसा रेतीचा ढीग, जप्त केला.


 घटनास्थळी प्रवीण महाजन राहणार यवतमाळ, सुरेश कुंडलिकराव धाडे, संजय सपाट, सचिन उमाकांत दरणे राहणार हिवरा व इतर पाच सहा इसम उपस्थित झाले व त्यांनी सदर घाट हा आम्ही लिलावात घेतलेला असल्याचे असून आमचे चाहने व बोटी आमच्या मालकीची असल्याचे मात्र हा अवैध रेती उपसा वरोरा हद्दीत येत असल्याने तहसील विभागाणे कारवाई सुरू केल्यावर या सर्वांनी शासनाच्या कारवाईत अडथळा करून बोटी पोकलेन हलविण्यास अडथळा निर्माण केला तसेच पोकल्यांड बोटी ताब्यात असणाऱ्या पथकाला यांनी धक्काबुक्की करीत धमकी देत सायंकाळी साडे आठच्या सुमारास नदीच्या मार्गाने या सर्व वस्तू घालविण्याचा प्रयत्न केला म्हणून शासनाच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की करून सदर वाहन मालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला, ही कारवाही तहसीलदार रोशन मकवाने वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नो पानी वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या टीमने सदर कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत