बाल लेखक श्रीनिवास पांडे यांच्या याद है..? चे प्रकाशन थाटात
बाल लेखक श्रीनिवास पांडे यांच्या याद है..? चे प्रकाशन थाटात
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्नाकार,उदगीर : घरात कुठलाही साहित्याचा वारसा नसताना, वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एक खेड्यातला विद्यार्थी ज्याची मातृभाषा मराठी व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होत असतानाही त्याने हिंदी भाषेतून लिहिलेल्या व चेन्नई येथून छपाई करून घेतलेल्या ज्या पुस्तकाला आयएसबीन नंबर प्राप्त आहे.
अत्यंत प्रगल्भ विचाराचा बाल कवी श्रीनिवास पांडे च्या याद है....? या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहोळा प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते उदगीर भूषण रमेश अंबरखाने यांचे अध्यक्षतेखाली व हिंदीचे अभ्यासू साहित्यिक डॉ. कुंटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संयोजक अनंत कदम प्रा. डॉ.बालाजी सूर्यवंशी मारुतीराव पांडे, वैशाली पांडे, प्रसिद्ध नाटककार तुळशीदास बिरादार, अभिजित नळगीरकर व ग्रंथमित्र दीपक बलसुरकर आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
चला श्रीनिवास कवितेच्या बनात या चळवळीचे च्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीनिवास पांडे यांनी लिहिलेल्या याद है या कविता संग्रह वर सविस्तर असे विचार तुळशीदास बिरादार यांनी मांडले . श्रीनिवास च्या बालपणापासूनच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत नळगीरकर यांनी टाकला. तर याद है या कवितासंग्रहातील कवितांचा दर्जा श्रीनिवासच्या लेखन शैलीचा आणि त्याच्या विचारांच्या प्रगल्भतेचा भाव, त्याच्या लेखनातील विचार आदी सर्व बाबींवर सखोल असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कुंटे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात रमेश अंबरखाने म्हणाले चला कवितेच्या बनात ही चळवळ अशा नवोदित लेखकांना सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आलेली असून ज्या नवोदिताकडे प्रस्थापितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते असते अशांचा सातत्याने गौरव करण्याचे कार्य या चळवळीच्या माध्यमातून अनंत कदम हे सातत्याने करत आलेले आहेत. लेखक नवोदित असल्यामुळे त्याच्या चुका कडे लक्ष न देता त्याचे विचार आणि लेखनशैलीचे सर्वांनी कौतुक करावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी महाविद्यालय उदगीर चे हिंदी विभागातील अभ्यासू साहित्यिक प्रा.डॉ.बालाजी सूर्यवंशी यांनी केले.आभार मारोतीराव पांडे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत