वंचित व अपक्ष यांच्या सहकार्याने पंचायत समिती ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न
अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापतीपदावर वंचितच्या सौ सविता कोडापे तर उपसभापती पदावर भाजपप्रणीत अपक्ष होमराज पुस्तोडे यांची निवड
वंचित व अपक्ष यांच्या सहकार्याने पंचायत समिती ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, संतोष रोकडे,गोंदिया ; गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आदिवासीबहुल व दुर्गम म्हणून गणला जाणारा अर्जुनी-मोर तालुका असून अर्जुनी-मोर पंचायत समिती निवडणूक सहा मे रोजी पार पडली या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार काँग्रेस पक्षाचे चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार तर वंचित बहुजन आघाडी यांचे एक तसेच भाजपातून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आले.
एक उमेदवार असे पक्षीय बलाबल होते अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने तसेच भाजपाकडे या राखीव पदाचे उमेदवार नसल्याने वंचित बहुजन आघाडी च्या विजयी उमेदवार सौ सविता कोडापे व अपक्ष म्हणून निवडून आलेले होमराज पुस्तोडे यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाने अर्जुनी-मोर पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला विशेष म्हणजे भाजपाचे सहा सदस्य निवडून येऊन सुद्धा सभापतिपद है राखीव असल्याने वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले मात्र उपसभापती पद सुद्धा अपक्ष उमेदवार होमराज पुस्तोडे यांना द्यावे लागले भारतीय जनता पक्षाचे सहा सदस्य असून सुद्धा महत्त्वाचे पद न मिळाल्याने भाजपाला काय मिळाले अशा चर्चा तालुक्यात सुरू आहेत.
सभापतीपदासाठी काँग्रेसच्या वतीने भागेश्वरी सयाम तर भाजपाकडून वंचित बहुजन आघाडी च्या सविता कोडापे यांनी नामांकन दाखल केले होते तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुष्पलता दुरुगकर व भाजपाकडून होमराज पुस्तोडे यांनी नामांकन दाखल केले होते यावेळी हात वर करून मतदान घेण्यात आले सभापतीपदासाठी भाजपप्रणीत वंचित बहुजन आघाडी च्या सौ सविता कोडापे यांना आठ मते तर भागेश्वरी सयाम यांना सहा मते मिळाली त्यामुळे सभापतीपदावर सौ सविता कोडापे विराजमान झाल्या तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत होमराज पुस्तोडे यांना आठ मते तर पुष्पलता दुरुगकर यांना सहा मते मिळाली त्यामुळे होमराज पुस्तोडे यांनी उपसभापती पद आपल्या पदरात पाडून घेतले.
नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी अर्जुनी-मोर पंचायत समिती क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय कुमार सूर्यवंशी तहसीलदार विनोद मेश्राम गट विकास अधिकारी विलास निमजे विस्तार अधिकारी पंचायत राजकुमार ब्राह्मणकर यांनी काम पाहिले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत