पहिल्याच वादळी पावसाने नागपूरकरांची उडवली झोप,
पहिल्याच वादळी पावसाने नागपूरकरांची उडवली झोप,
शहरातील झाडे कोसळली, विजेचे तार तुटल्यामुळे हजारोंची रात्र अंधारात
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : नागपुरात 24तास अन पूर्वी आलेल्या पहिल्याच वादळी पावसाचा नागपूरकरांना जोरदार तडाखा बसला अवघ्या तासभराच्या वादळी पावसात 141 झाडे पडली विजेचे खांब पडले तारा तुटल्या यामुळे दोन हजारांच्या व घरांमध्ये अंधार पसरला बुधवारी ही स्थिती कायम असल्याने नागरिकांना उकाड्यात दिवस काढावा लागला ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मनपा आणि वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेची दिवसभर धावाधाव सुरू होती.
मंगळवारी वादळी पावसाने शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्यास पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी सत्तर कॉल आले अपुऱ्या मनुष्यबळाचा तही अग्निशमन व उद्यान विभागाच्या जमुनी पडलेली झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.
सर्वाधिक नुकसान पश्चिम व उत्तर नागपुरात
पश्चिम व उत्तर नागपुरात वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले सिव्हिल लाईन्स सदर गिट्टीखदान काटोल रोड जरीपटका गोरेवाडा इत्यादी भागातील झाडांना सर्वाधिक नुकसान झाले झाडे हटविण्याच्या काम बुधवारी संग सायंकाळपर्यंत सुरू होते केटी नगर उद्यान राम कुलर जवळ गिट्टीखदान चौक बिनाकी मंगळवारी शिवाजी पुतळा दटके हॉस्पिटल मागे शांतिनगर कॉलनी आयबीएम रोड मोठी मस्जिद जवळ सीआयडी ऑफिस गिट्टीखदान पोलीस स्टेशन जैव-विविधता कार्यालय रोड रामगिरी बंगला रोड वापर स्ट्रीट रविनगर कॉटर परिसर व रोड पोलिस लाइन टाकळी रमाई नगर उद्यान लघुवेतन कॉलनी जरीपटका जनता चौक जागृती कॉलनी उद्यान टीव्ही टॉवर चौक उत्कर्ष नगर नासुप्र उद्यानाजवळ जेल रोड रहाटे कॉलनी टेका नाका इंदुरा इत्यादी भागांमध्ये पडलेली झाडे हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
तक्रारींचे निराकरण होणार - आयुक्त
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे नागरिकांच्या समस्या वर तक्रार निवारणासाठी विभाग 24तास सेवेत आहे तक्रार मिळतात संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचून मदत करीत असल्याची माहिती आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिली.
मदतीसाठी येथे संपर्क साधा
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे नागरिकांनी. 0712 2567029 , 2540299 , 2567777 , 2540188 या क्रमांकावर किंवा 101 या क्रमांकावर संपर्क साधावा.
वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर
वादळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणेचे ही मोठे नुकसान झाले पश्चिम नागपूरला सर्वाधिक फटका बसला दोन हजार पेक्षा जास्त घरात रात्रभर अंधारवाटा काही भागात तर बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता महावितरण अभियंता व कर्मचारी रात्री टॉर्चच्या प्रकाशात मदत कार्यात व्यस्त होते महावितरणचे प्रादेशिक संचालक सुभाष रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी प्रभावित भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला अधीक्षक अभियंता अमित परांजपे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे उपविभागीय अधिकारी प्रशांत नितीन उज्जैनकर आदी उपस्थित होते.
40 खांब पडले तारा तुटल्या
मंगळवारी महा पारे शनचे सबस्टेशन ठप्प पडल्याने शहरातील वीज संकटाला सुरुवात झाली त्यात पावसाची भर पडली महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार यामुळे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले विस्तारावर चाळीस खांब पडले काही ठिकाणी झाडे तारावर पडली बुधवारी सायंकाळपर्यंत 90 टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत