Breaking News

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारीच्या खुर्चीला घातला हार

 भारतीय जनता पार्टीच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारीच्या खुर्चीला घातला हार

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतीनिधी,सुरज शहाणे,सेलू ; नगरपरिषद सेलू ला मुख्याधिकारी नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत नामांतरण, घरकूल योजना, बांधकाम परवाना,व इतर शेकडो फाईल नगरपरिषद मध्ये पडून आहेत.वारंवार सांगुन पण कायम स्वरुपी मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू ला मिळत नाही.

 या गोष्टीचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सेलू च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू च्या रिकाम्या खुर्चीला हार घालण्यात आला. व येत्या चार दिवसांत लोकांची कामे नाही झाली तर नगरपरिषद सेलू ला कुलूप ठोकण्याचा इशारा भाजप जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग शेळके यांनी दिला.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग शेळके, कपिल फुलारी, अशोक शेलार, गणेश ढेंगळे, गुड्डू दिक्षित, सुनील चव्हाण, राजू सोळंके,अर्जुन चव्हाण, सुमित चव्हाण, संजय चव्हाण, पवन पालवे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत