आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कोसंबी गवळी वर भाजपाचा झेंडा
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कोसंबी गवळी वर भाजपाचा झेंडा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी, चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. कोसंबी गवळी रन. 1111 या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड अपेक्षेप्रमाणे अविरोध झाली आहे. अध्यक्ष पदी भाजपाचे श्रीरामजी मानकर तर उपाध्यक्ष पदी भाजपाचे जगदिश पाटील राऊत यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.
कोसंबी गवळीसह परीसरातील नवेगाव हुंडेश्वरी, गोवारपेठ, राजोली, बॉड, नवानगर, रानपरसोडी, वासाळा मक्ता व पारडी गायमुख या गावांचा समावेश •असलेली ही नागभीड तालुक्यातील सर्वांत मोठी संस्था अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार बंटीभाऊ भांगडिया व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे 13 ही उमेदवार अविरोध विजयी झाले. यात सर्वसाधारण गटातून श्रीरामजी मानकर, पंढरी मानकर, ईश्वर रंधये, गोकुळ उईके, अशोक श्रीरामे, अमरदिप रंधये, रामप्रकाश राऊत व जगदिश पाटील राऊत यांची अविरोध निवड झाली. अनुसूचित जाती/जमाती गटातून गिरीधर इंदुरकर, इतर मागासवर्गीय गटातून गुरुदास गुरनुले, विमुक्त व भटक्या जमाती गटातून मधुकर ठाकरे तर महिला राखीव गटातून कौसल्या रावजी ठाकरे व उर्मिला उध्दव उईके यांची अविरोध निवडून आले.
पदाधिकारी निवडणुकीत अविरोध निवड झालेले अध्यक्ष श्रीरामजी मानकर व उपाध्यक्ष जगदीश पाटील राऊत यांचे भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी कोसंबी गवळी येथील संस्थेच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी निवडणूक पिठासीन अधिकारी कु.व्हि.पी.भोज यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. याप्रसंगी कुउबा संचालक धनराज ढोक, माजी सरपंच मच्छिंद्र चनोडे, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे ग्रा.पं.सदस्य कैलास रंधये, बुथ प्रमुख प्रविण श्रीरामे यांच्या सह संस्थेचे सचिव टोंगे यांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत