Breaking News

लोकनेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ व शरबत वाटप कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरचे आयोजन.

 

लोकनेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ व शरबत वाटप कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरचे आयोजन. 

भंडारा : जिल्ह्याचे भुमीपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव जनसेवक श्री. पवन मस्के यांच्या वतीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना शरबत वाटपाचा व फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पक्षाच्या वतीने  भव्य रक्तदान शिबीर मुस्लिम लायब्ररी कल्चर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

भंडारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा भंडारा जिल्हा हा गृह जिल्हा असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. काँग्रेस कमिटीचे भंडारा जिल्हा सचिव पवन मस्के हे नेहमीच विविध उपक्रम रावबत असतात. आमदार नाना पटोले यांचे ते निकटवर्ती असून त्यांच्या या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .  यावेळी पवन मस्के, मोनार्च शेंडे, सौरभ बाभरे, चिराग गुरणुले, लूकेश जोध, सुमित मडामे यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत