सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष म्हणजे शिवसेना - खासदार ओमराजे निंबाळकर
सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष म्हणजे शिवसेना - खासदार ओमराजे निंबाळकर
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, शिवाजी निरमनाळे,लातूर : शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी व यांच्या विचारातून निर्माण झालेल्या शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आमदार खासदार बनवले सर्वसामान्यांचा विचार करून निर्णय घेणारा एकमेव शिवसेना हाच पक्ष आहे असे मत हलगरा येथील शाखा उद्घाटन व शिवसेना मेळाव्याप्रसंगी बोलताना धाराशिव लोकसभेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
आठ जून रोजी औरंगाबाद( संभाजीनगर) येथे होणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जागर शिवसेनेचा यासाठी लातूर जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार संतोष सांबरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज हलगरा येथे सभा घेण्यात आली, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका डॉक्टर शोभाताई बेंजरगे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य युवा सेनेचे जिल्हाधिकारी ॲड राहुल मातोळकर तालुका प्रमुख अविनाश रेशमे भागवत वंगे पंडित भंडारे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव शेखर चव्हाण औसा विधानसभेतील रोहित गोमदे लातूरचे माजी नगरसेवक सुनील बसपूरे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
यापुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे म्हणजे आवळा देऊन कवळा पाडणारे सरकार आहे शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन येण्याच्या अगोदर सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांच्या घरात असतो तो व जेव्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होते तेव्हा तो भाव चार हजार ते साडेचार हजार रुपयापर्यंत खाली आणला जातो याच वेळेस सोयाबीन पेंड व तेल आयात करण्याचे या सरकारला सुचते जेणेकरून कमीत कमी दोन एकर वाल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाख रुपयांचा फटका सहज बसतो व दुसरीकडे शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये टाकून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो व शेतकरीही सुद्धा मोदीचे 2000 आले म्हणून गावभर सांगत फिरतो.
एकीकडे लाखो रुपयाचे नुकसान करणारे सरकार दोन हजारात खुश करते म्हणून आवळा देऊन कोहळा पाडणारे हे सरकार असल्याचे सांगण्यासाठी जागर जनतेचा हा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून घेतला जात आहे पेट्रोल-डिझेलच्या किमती मध्ये भरमसाठ वाढ केली मागच्या वर्षी नांगरणीसाठी काय भाव होता व आज काय आहे हे तपासून पहा गॅस कनेक्शन देणारे हेच सरकार व सबसिडी बंद करणारे सुद्धा हेच सरकार आहे देशाच्या आयात-निर्यातीच्या धोरणावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो यामुळे मुळेच शेतकऱ्याचा माल येताच आयात केली जाते भाव पडतात याला केंद्र सरकारच जबाबदार आहे म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वसामान्यांचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिक शाखाप्रमुख विभागप्रमुखांनी सर्वसामान्याच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे.
सर्वसामान्य गोरगरिबांची कामे केल्यास सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा सत्तेत येईल म्हणून ऊन ऊन शिवसैनिकाने आपले मोठे बॅनर छापून वाढदिवस करण्यापेक्षा एका गोरगरीब आजी किंवा आजोबा ची पगार करून दिली तर ते गावभर सांगतील ते हक्काचे मतदान तयार होईल म्हणून शिवसैनिकांनी सर्वसामान्याच्या कामाला महत्त्व दिले पाहिजे असे मत या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मिनी हलगरा येथे बोलत असताना व्यक्त केले यावेळी आमदार संतोष सांबरे जिल्हा जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने महिला आघाडीच्या शोभाताई बेंजरगे विनोद आर्य यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख अविनाश रेशमे तर सूत्रसंचालन शिवसेनेचे शहर संघटक हरिभाऊ सगरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा सेनेचे अण्णासाहेब मिरगाळे प्रशांत वांजरवाडे हलगरा येथील मनोज तांबाळे शाखाप्रमुख श्रीहरी मुगळे युवा सेनेचे अजय मसलगे श्रावण गरुड सुशांत रोळे बळीराम रोळे राम टोम्पे शिवाजी शेळके शेषराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत