Breaking News

रस्त्यावरच्या अपघातांना रोखण्यासाठी आपल्या हातातले प्रयत्न कमी पडू देवु नका ~ शरद पवळे

 रस्त्यावरच्या अपघातांना रोखण्यासाठी आपल्या हातातले प्रयत्न कमी पडू देवु नका ~ शरद पवळे


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नगर : 

 नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणच्या प्रलंबित चौपदरीकरणासह नगर-पुणे महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातांची साखळी मालिका रोखण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारून नारायणगव्हाण चौपदरीकरणास अपघात मुक्तीसाठी स्वयंस्फूर्तीने पाठपुरावा करावा निष्पापांचे बळी जाणार नाहीत यासंदर्भात  उपकार्यकारी अभियंता एस बी बि-हारे  यांना आतापर्यंतचे आंदोलनांचे स्मरण पत्र देत विषयांना गांभिर्याने घेण्यासंदर्भात सांग्यात आले~ सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे

 

 नारायणगव्हाण चौपदरीकरणासह नगर-पुणे महामार्गावरील सतत घडणाऱ्या अपघातांच्या निवेदनासंदर्भात वरिष्ठांसोबत तातडीची बैठक घेवुन नारायणगव्हाण चौपदरीकरणासह सुरक्षितते संदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतःहून पाठपुरावा करू~ उपकार्यकारी अभियंता एसबी बि-हारे

 

नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावातील प्रलंबित चौपदरीकरण व नगर पुणे महामार्गावर सतत अपघातांची चाललेली साखळी मालिका यामुळें निष्पाप नागरिकांना येणाऱ्या अपंगत्वा बरोबर अनेकांना प्राण गमवावे लागले असुन याला रोखण्यासाठी नारायणगव्हाण ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने उपोषणआंदोलने करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम अनेक वेळोवेळी केले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नारायणगव्हाणचा रस्ता जीवघेणा बनला असून शालेय विद्यार्थी, आबालवृद्धांसह नागरिकांना रस्त्यावरचे दळणवळण करणे हलाखीचे बनले असून नगर-पुणे महामार्गावर अनेक प्रवाशांना अपघातामुळे अपंगत्वाबरोबर प्राणही गमवावे लागले आहेत.

 या विषयाला गांभीर्याने घेत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनाचे स्मरणपत्र उपकार्यकारी अभियंता एस बी बि-हारे यांच्याकडे देत आता नव्याने झालेल्या गंभीरअपघातांसंदर्भात चर्चा केली रस्त्यावर डिझेलच्या टँकरचा अपघात झाल्यामुळे पूर्ण गाव उध्वस्त होण्यासारखी परस्थिती निर्माण झाली होती नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत बिकटअशा परिस्थितीमध्ये अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवून अग्निशामक दलाच्या माध्यमातून सांडलेल्या डिझेलवर पाणी सोडत धोका पाळण्यात आला त्याच बरोबरआठवड्यात इंडिका गाडीचा अपघात झाला.

 त्यामध्ये लहान लहान चार-पाच मुले होती अपघात भयंकर झाला होता गाडीतून मुलांमुलांसोबत इतरांना नागरिकांनी बाहेर काढत देवदूताचे काम करत गाडीला बाजूला ठेवले सुदैवानेमुलांना मोबत काही अघटीत घडले नाहीअसा चित्तथरारक प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला असून पुढेअघटित घडू नये यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊनआता हे अति होत आहे असे सांगत तातडीने विषय मार्गी लावावा आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही अशी आशा बाळगतो असे सांगत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनीअधिकाऱ्यांना स्वतःहून तुम्ही पाठपुरावा करावा व नगर पुणे महामार्ग अपघात मुक्त करावाअसे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत