Breaking News

मुरमाडी तूप जि.प. शाळेचा निकाल १०० टक्के

 मुरमाडी तूप जि.प. शाळेचा निकाल १०० टक्के

१९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महा घडामोडी न्यूज विशैष प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे, भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षा(एसएससी) चा निकाल दिनांक १७ जून शुक्रवार ला दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुरमाडी/तूप तालुका लाखनी येथील १९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत १३ विद्यार्थी प्रथम तथा ६ विद्यार्थी द्वितीय श्रित उत्तीर्ण झाले. 

कु. मीनाक्षी सेवकराम तरोने ८५ टक्के, कु. आशू प्रेमानंद भोवते ८३.६० टक्के, शाहिद खेमराज शहारे ८३, कु. मोनाली आनंदराव दोनोडे ८३ टक्के, कु. प्रतीक्षा खेमराज दहेलकर ८३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे प्रथम, द्वितीय व संयुक्त तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय परिसरात शिक्षकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक प्रामुख्याने उपस्थित होते. 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यशासे श्रेय आई- वडील, आत्यष्ठ व गुरुजनांना दिले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जि. प. सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष गणेश निरगुळे तसेच पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, मुख्याध्यापक एन.झेड. वासनिक, सहाय्यक शिक्षक एस.जी. पाल, डी.एस. काळे, सी.के. पाल, पी.बी. भेंडारकर, बी.आर. वघारे, ए.एस. इनवाते, गीता मंगरूळकर तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत