Breaking News

पावसाअभावी धानाची पेरणी रखडण्याच्या मार्गावर

 पावसाअभावी धानाची पेरणी रखडण्याच्या मार्गावर

पर्याप्त पाऊस झाला नाही,बि-बियाणाचा तुटवडा

 महा घडामोडी न्यूज विशेष जिल्हा प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे,भंडारा : रोहिणी नक्षत्र कोरडा गेला मृग नक्षत्र लागून १० दिवस लोटले तरी २ ते ३ वेळा रिमझिम पाऊस तसेच ढगाळ वातावरण असले तरी पर्याप्त पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी रखडण्याचे मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भरीझझ भरझझझ म्हणून शासनाकडून ५० टक्के सुटीवर शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या धानाच्या बियानाचाही तुटवडा जाणवत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. 

साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर अग खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ८५३ हेक्टर आहे त्यापैकी खरीप हंगाम २झ मध्ये २२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे .तालुक्यात निधी अभावी सिंचन प्रकल्प रखडले असल्यामुळेसूझै बहुतांश शेतजमीन कोरडवाहू असून पावसाचे पाण्यावर अवलंबून आहे. मागील वर्षीच्या दुष्काळाचे शल्य बाजूला सारुन धान उत्पादक शेतकरी नव्या उमेदीने कामास लागला असला तरी पावसाअभावी पेरणीस विलंब होत आहे. 

धान उत्पादक शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून पेरणीकरिता पावसाची चातकासारखी वाट बघत असतो पण या वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडा गेला मृगात २ ते ३ दिवस रिमझिम पाऊस झाला. पण पर्याप्त नसल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे. समजा कोरड्या वरची पेरणी केल्यास बियाणे पक्षी खाण्याची शक्यता असते आणि अशीच रिमझिम व त्यानंतर ऊन तापल्यास अंकुर निघून मरून जाईल. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाजही वास्तवात येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे धान पेरणी खोळंबण्याचे मार्गावर आहे.     

बि-बियानाची कमतरता

कृषी विभागाचे वतीने कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडीवर धानाचे बियाणे उपलब्ध केले जातात. खरीप हंगाम २०२२ मध्ये १००१, कर्जत, १०१०, सुवर्णा, आयआर-६४, एचएमटी ह्या प्रजातीची बियाणे उपलब्ध असली तरी मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे बि-बियाणाची कमतरता जाणवते.

 शासनाद्वारा शेतकऱ्यांना सबसिडीवर पुरविण्यात येणारी बि-बियाणे बाबद ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहिती होत नाही झालीच तर उपलब्ध साठा संपतो. त्यामुळे कृषी सहाय्यक साझा अंतर्गत बियाणे विक्रीची व्यवस्था करावी. आकाश कोरे माजी जि. प. सदस्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत