बहुचर्चित वनकुटे सेवा सोसायटीवर आ.लंके यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा !
डॉ.नितीन रांधवण सह सर्व नवनिर्वाचीत संचालकांनी घेतली आ.लंके यांची भेट !
भविष्यात आ.लंके यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार सर्व सदस्यांनी दिली ग्वाही !
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठुबे,पारनेर : आ.निलेशजी लंके यांच्या नेर्तुत्वाखाली मतदार संघातील सर्वाधीक सेवा सोसायट्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवीन्यात आ. लंके यशस्वी झाले आहेत. बहुचर्चित आसलेल्या वनकुटे सेवा सोसायटी ही आ.लंके यांच्या विरोधात गेली आसे विरोधकांनी प्रसार माध्यमांवर प्रसारीत केले होते.परंतु त्यात कुठलेही तथ्थे नाही सर्व संचालक हे आ,लंके यांच्या विचारांवर प्रेम करणारे आहे. असे यावेळी पॅनल प्रमुख डॉक्टर नितीन रांधवन यांनी सांगितले.
यावेळी निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सदस्य त्यात काशिनाथ बुचडे,अशोक गागरे,मच्छिंद्र खामकर,ज्ञानेश्वर गागरे,मच्छिंद्र पठारे,भानुदास गागरे,पारूबाई वाबळे, विठ्ठल काळन,कौशिक औटी,भिवा केसकर,सोनबा गोरे, सूर्यभान औटी,गणेश मुसळे,गणपत काळकर,भास्कर शिंदे,बाबाजी गागरे,श्रीकांत डुकरे,चिवा औटी,पवन खामकर,रेवन लोणकर,नसीर शेख,आप्पा वाबळे,बाळू डुकरे,भाऊसाहेब गागरे,शिराज शेख,सुरेश डुकरे यांच्यासह वनकुटे गावात कार्यरत असणारे अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत