Breaking News

अग्नीपथ योजनेवर तत्काळ पुनर्विचार करण्याची आवश्यकता

 गोरगरीब ग्रामीण तरुणांच्या भवितव्याशी खेळ नको - चारुल रामटेके

अग्नीपथ योजनेवर तत्काळ पुनर्विचार करण्याची आवश्यकता

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : गेल्या दोन वर्षापासून सैन्यदलात भरतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या लाखो तरुणांच्या आकांक्षांना वर पाणी सोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केले आहे सैन्य भरतीसाठी केंद्राने घोषित केलेली अग्निपथ योजना अनुचित असून गोरगरीब ग्रामीण युवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याची खेळत असल्याच्या दावा प्रहार विद्यार्थी संघटनेने केला आहे.

 अग्नीपथ योजनेवर तत्काळ पुनर्विचार करण्याची गरज जिल्ह्याचे प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख चारुल रामटेके यांनी केली. योजने विरोधात न्याय मागण्यासाठी आंदोलन करणार्‍या तरुणांनी जाळपोळ हिंसाचार ऐवजी शांततेत आंदोलन करावे. अग्नी वीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच आसाम रायफल्स मधील भरतीसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केला असला तरी दर चार वर्षांनी सैन्यदलातून बाहेर पडणाऱ्या उर्वरित कुशल मनुष्यबळाची समायोजन सरकार कसे करणार असा सवाल उपस्थित केला. 

सैन्यात भरती होण्यासाठी लाखो तरुण दरवर्षी महिनत घेतात त्यांच्या महिनती सह स्वप्नांच्या योजनेच्या माध्यमातून सरकार चुराडा करीत आहे असा आरोप देखील त्यांनी केला. सैन्य दला सह सरकारी नोकरीतील पेन्शनचा लाभ इत्यादी समाप्त करण्यासाठी सरकार सैन्यात जवानांच्या भरती कमी करून चार वर्षासाठी मर्यादित करत आहे. 

देशातील जनता अगोदरच गरिबी, महागाई, बेरोजगारी तसेच केंद्र सरकारचे चुकीचे धोरण आणि अहंकारी कार्यशैलीमुळे त्रस्त आहे अशातच सैन्य भरती बाबत तरुणांमध्ये उत्पन्न झालेली खंत आता निराशा दायक वातावरण निर्माण करीत आहे त्यामुळे सरकारने तात्काळ त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे प्रहार विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाप्रमुख चारुल रामटेके यांनी म्हटले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत