दिवसाढवळ्या वाळू माफियांची वाळू चोरी, तात्काळ कार्यवाही करा - प्रा. आण्णासाहेब मिरगाळे.
दिवसाढवळ्या वाळू माफियांची वाळू चोरी, तात्काळ कार्यवाही करा - प्रा. आण्णासाहेब मिरगाळे.
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी शिवाजी निरमनाळे,लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये काही दिवसांपासून वाळूचोरी संधर्भात निवेदन देऊन सुद्धा काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज शिवसेना व युवासेनेच्या वतीने नदीवर जाऊन पाहणी केली असता सहा ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने वाळू माफिया दिवसाढवळ्या वाळू चोरी करत असताना दिसून आले.
यासंदर्भात फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंगही लोकेशन सह पुरावे देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. अशा वाळू माफियावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना व युवासेनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.सोबत युवासेनेचे तालुकाप्रमुख कृष्णा पवार, तालुका संघटक गोपाळ शिंदे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत