Breaking News

रेल्वे गाड्या जाहीर करताना खंडवा रावेर लोकसभा शहराचा विचार करा

 अन्यथा निवडणुकीत योग्य निर्णय जनता घेईल
प्रवाशी नेते प्रशांत बोरकर यांचा इशारा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर : राष्ट्रीय जनता दलाचे रेल्वे सुविधा मागणीस काहीं अंशी यश आले असून महाराष्ट्र राज्य मद्ये तीन गाड्या सुरू केल्या आहेत.परतू पॅसेंजर गाड्या बंद करून एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या त्यामुळे गरीब प्रवासी जनतेवर अन्याय होणार आहे.

त्यात जेष्ठ नागरिक महिला यांचे प्रवासी तिकीटसवलती बंद केल्या आहेत त्यापण तसेच खंडवा बुऱ्हाणपूर रावेर हून रेल्वे प्रवासी गाड्या लवकर सुरू कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी मित्र श्री प्रशांत बोरकर यांनी रेल्वे प्रशासनास केली आहे.

 खंडवा बुऱ्हाणपूर रावेर हून पुणे मुंबई अमरावती नंदुरबार सुरत साठी रेल्वे प्रवासी सवारी गाड्या सुरू कराव्यात मागणी सातत्याने पाठपुरावा राष्ट्रीय जनता दलाचे तसेच रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे केला जात आहे. वारंवार तक्रार पत्र पाठवून मागणी केली त्या वेळी भुसावळ हून गाड्या सुरू केल्या जातात आणि खंडवा बुऱ्हाणपूर रावेर लोकसभा शहरभागाकडे मुद्दामून दुर्लक्ष केले जाते त्यामुळे या खानदेश निमाड महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सीमा भागातील जनतेमध्ये नाराजी संताप व्यक्त केला जात आहे.

खंडवा बुऱ्हाणपूर हून मुंबई पुणे कोल्हापूरसाठी संध्याकाळी फास्ट सवारी गाडी सुरू करा.तसेच जळगाव नंदुरबार अकोला शेगाव शिर्डी साठी मेमु ट्रेन सुरू करावी रावेर येथे महानगरी एक्स्प्रेस पुणे दानापूर .साईनगर शिरडी. सचखंड श्री गंगानगर नांदेड एक्स्प्रेस गाड्या थांबण्यासाठी रेल्वे राज्य मंत्री खासदारआणि रेल्वे समिती यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि रेल्वे प्रवासी चळवळीचे मित्र नेते श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर रित्या केली आहे.

नवीन रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करताना खंडवा बुऱ्हाणपूर रावेर लोकसभा शहराचा विचार केला पाहिजे नाहीतर आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल किंवा प्रवसी आपले उमेदवार उभे करतील आणि आमदार खासदार करून आपल्या भागात सेवा सुविधा उपलबध करून देतील अशा इष्यारा दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत