वादळी पावसामुळे शेवगे गावातील नुकसान ग्रस्तांना रोहिनिताई खडसे खेवलकर यांची भेट
वादळी पावसामुळे शेवगे गावातील नुकसान ग्रस्तांना रोहिनिताई खडसे खेवलकर यांची भेट
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,जितेंद्र गायकवाड,जळगाव : शेवगे ता बोदवड येथे झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे ,जनावरांच्या गोठयांचे, शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आज शेवगे येथे भेट देऊन राजाराम सुलताने यांच्या गोठ्याची,शेवगे शिवारातील शेतीची व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी यासाठी महसुल यंत्रणे समवेत संपर्क साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत (आबासाहेब) पाटील, मधुकरभाऊ राणे,रामदासभाऊ पाटील,किशोरभाऊ गायकवाड, भरत अप्पा पाटील,भागवत भाऊ टिकारे, वामनराव ताठे,प्रदिप बडगुजर,डॉ ए एन काजळे , शिवाजीराव ढोले,प्रमोदभाऊ फरफट,सतिषभाऊ पाटील,ज्ञानेश्वर भाऊ पाटील, रामरावभाऊ पाटील, विजयभाऊ चौधरी, नईमभाई बागवान, पिंटू पाटील, निलेश माळी, एकनाथ खेलवाडे आणि शेतकरी बांधव ,ग्रामस्थ उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत