शासकीय गोदाम बांधकामात चोरीच्या रेतीचा वापर
बारव्हा येथील प्रकार :नायब तहसीलदाराच्या धाडीत वास्तव उघड
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, लाखांदूर : जिल्ह्यात रेती चोरी हा विषय नाही.मात्र शासकीय बांधकामासाठी ही चोरीच्या रेतीचा वापर होत असल्याचे वास्तव तालुक्यातील बारव्हा येथे उघडकीस आले .नायब तहसीलदार यांनी शासकीय गोदामाच्या बांधकामावर बुधवारी धाड टाकली तेव्हा 10 ब्रास रेती आढळून आली. रेती साठ्याचा पंचनामा केला.
त्यातील तालुक्यातील बारव्हा येथे नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत एक कोटी 85 लाख रुपयांच्या शासकीय गोदामाचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम लाखांदूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत एका कंत्राटदाराकडून केले जात आहे. 500 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेल्या या गोदामाचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील एकही रेतीघाटाचा यंदा लिलाव झाला नाही .बहुतांश बांधकामात चोरीची रेती वापरली जात आहे .बारव्हा येथे शासकीय गोदाम बांधकामात चोरीच्या रीतीच्या वापर होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली त्यावरून लाखांदूर चे नायब तहसीलदार अखिल मेश्राम यांनी बुधवारी बांधकामा स्थळी भेट दिली. तेथे रीतीचा साटा आ ढळून आला. नायब तहसीलदार यांनी पंचनामा केला कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
रेती तस्करीला बांधकाम विभाग जबाबदार
लाखांदूर तालुक्यात यंदा एकही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. असे असताना तालुक्यात विविध विकास कामाच्या बांधकामाना गती दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत विकास कामाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. बांधकामात चोरीच्या रेतीचा सर्रास वापर होत होतो .मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कंत्राटदारांना याबाबत जाब विचारला नाही रेती चोरी ला बांधकाम विभागाच जबाबदार असल्याचा आरोप आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत