रावेर मध्ये MSEB इंजिनिअर सोनराणी साहेबांचा लोडशेडिंग आणि वृक्ष कटाईच्या नावावर लोकांच्या जीवाशी खेळ
MSEB इंजिनिअरची तानाशाही वृत्तांकन मालिका - 1
रावेर मध्ये MSEB इंजिनिअर दिलीप सुंदराणी साहेबांचा लोडशेडिंग आणि वृक्ष कटाईच्या नावावर लोकांच्या जीवाशी खेळ
वारंवार लाईन जाण्याचा रावेरच्या जनतेला त्रास
विजे अभावी लोकांचे जगणे झाले मुश्किल
कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र-उकड्यात लोकांना सोसावा लागत आहे त्रास
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर येथील MSEB आणि वीज ग्राहक यांचा विषय जेव्हा पासुन इंजिनीअर दिलीप सुंदराणी आले तेव्हा पासून गाजत आहे आणि संघर्ष पूर्ण राहिला आहे .या बाबत सविस्तर वृत्त असे की पावसाचा एक थेंब जरी आला तरी हे महाशय त्यांच्या कर्मचार्यांना त्वरित वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देतात आणि दररोज सद्या 5 ते 7 तास लाईट गेलेली असते ,कधी वृक्ष कटाई च्या नावावर लाईन तासंतास गायब केली जाते तर कधी परमिट च्या नावावर आणि आगोदरच जनता उकाड्याने परेशान झाले.
त्यात थोडीशी जरी हवा आली तरी संपूर्ण रावेर शहरातील लाईट दिलीप सुंदराणी इंजिनिअरच्या एका आदेश्यावर गेलेली असते, हा अधिकारी कोणालाही जुमानत नाही ,याच्या वर याच्या सिनियर अधिकाऱ्यांचा काहीही वचक नाही, बऱ्याचदा कॉल करून प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतु दिलीप सुंदराणी उलटसुलट उत्तरे देण्यापलीकडे कोणतीही मदत करत नाही, उलट अजून 2 ते 3 तास लाईट गेलेली असते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सुध्दा हतबल झालेले याच्या वर्तनावरून दिसून येते.
नको ते डेरेदार वृक्ष तोडले जातात आणि वन विभाग देखील कानाडोळा करतांना दिसतो ,या दोघांमध्ये काय गोड बंगाल आहे हे रावेर च्या नागरिकांना कळायला मार्ग नाही, तरी वारंवार वीज पुरवठा खंडित करण्याने काय फायदा या इंजिनिअर ला होतो हे एक रहस्यमय कथा आहे, गरमी मुळे उकाड्याने लोकं खुप त्रस्त झाले आहेत त्यात घंटोघंटी लाईट न आल्याने लोकांवर काय बितत असेल याची कल्पना न केलेली बरी,
बरेच लोक लहान बालक वयोवृद्ध आजारी पडले असतात आणि सर्व सामान्य व्यक्तीला विजेची सवय झाली आहे कारण एक वेळ तो उपाशी पोटी जगू शकेल पण विना विज पासून जगू शकत नाही ही 21 व्या शातकातील सत्य परिस्थिती आहे त्यामुळे वारंवार विज पुरवठा बंद करणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणे आहे.ताबडतोब या गंभीर प्रकरणाचा तोडगा MSEB ने काढावा,अन्यथा लवकरच MSEB च्या इंजिनिअर यांच्याविषयी अधिक माहिती व काळाबाजार उघड करण्यासाठी मालिका 2 लिहिली जाईल. व पुराव्यासहित कारवाईसाठी निवेदन सुद्धा दाखल करण्यात येईल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत