Breaking News

जिल्हा परिषद शाळेत पालक सभा संपन्न : व्यवस्थापन समितीही गठीत

 जिल्हा परिषद शाळेत पालक सभा संपन्न : व्यवस्थापन समितीही गठीत 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, साकोली : येथील सर्वात जूनी ब्रिटीशांच्या काळातील व १८६० पुर्वीची स्थापना असलेली मुख्य जि.प.केंद्रीय उच्च वरीष्ठ प्राथ.शाळा क्र.०१ ( सेमी इंग्लिश ) शाळेत ( १६ जुलै ) पालकसभा घेण्यात आली. सभेत शाळा व्यवस्थापन समिती नव्याने गठीत करण्यात आली यात स्थानिक स्वराज्य क्षेत्रातून माजी नगरसेवक व प्रसार माहिती क्षेत्रातून पत्रकारांची समितीत नेमणूक करण्यात आली.

        पालक सभेत मंचावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.बी.तिडके, माजी अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, पूर्व नगरसेवक हेमंत भारद्वाज, अविनाश भैसारे, निशा लांजेवार, राजेश नगरकर हे होते. पालकसभेच्या प्रास्ताविकात प्रभारी मुख्याध्यापक डी.डी.वलथरे यांनी सांगितले की मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शालेय शिक्षणासोबतच पालकांनी मुलांना निदान वाचणी व गृहकार्यासाठी दोन तास रोज द्यावेत. 

सभेत शाळा व्यवस्थापन समितीची यावेळी नविन कार्यकारणी जाहीर केली त्यामधे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्यपदी आर.बी.तिडके, हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, ज्योती गजापूरे, भुमिता आगासे, अमित लांजेवार, भारती बोरकर, सचिन डुंभरे, सचिव डि.डी. वलथरे व शिक्षक टि.आय.पटले यांचा समावेश आहे. कार्यक्रमात संचालन शिक्षक एम.व्ही.बोकडे यांनी तर आभार टि.आय.पटले यांनी केले.या सभेला शिक्षक आर.पी.दूपारे, आर.आर.बांगळे, आर.एल.बिसेन, कार्तिक साखरे यांनी आयोजनात सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत