Breaking News

कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामा मुळे गट क्रमांक १६८ मधिल धान पिकाची ४ चार वर्षापासून होत आहे नुकसान

 गोसे धरण शेतकऱ्यांचे मरण

कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गट क्रमांक १६८ मधिल धान पिकाची ४ वर्षापासून होत आहे नुकसान

चार वर्षापासून दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही शून्य

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : बोथली येथील शेतकरी नामे दौलत तुकाराम तोंडरे यांची गट क्रमांक १६८ आराजी ३ तीन एकर मालकीहक्काची जमीन आहे. याच जमीनी मधुन मासळ वितरिकेच्या एल-३ थ्री लघुकालव्याचे २०१८ मध्ये बांधकाम करण्यात आले आहे. त्या अगोदर मुख्य डाव्या कालव्यावरुन मासळ वितरिकेचे बांधकाम सुरू असतांना गुंजेपार किन्हि येथील शेतकऱ्यांनी जमीनीचा मोबदला कमी आहे.

 म्हणून सुरू असलेल्या बांधकामात अरथळा आनुन सुरू असलेले काम बंद पाडले तेव्हा पासून नहराचे बांधकाम किन्हि गुंजेपारच्या शेतकऱ्यांच्या शेतात आनुन गोसे प्रकल्प विभागाच्या अधिकार्यांनी बंद केले. कालव्याचे काम अपुर्ण व निकृष्ठ दर्ज्याचे असल्यामुळे मुख्य डाव्या कालव्यावरुन मासळ वितरिकेच्या कालव्यावरुन पाणि वाहात येऊन किन्हि गुंजेपारच्या शेतकर्यांच्या शेतात साचतो. व पुढे कालव्याचे बांधकाम नसल्यामुळे पाणि वाहात येऊन सदर शेतकऱ्यांच्या शेतात साचून राहातो त्यामुळे संपूर्ण धान पिक पाण्याखाली येऊन सडतो.

 शेतातील पाणि काढण्यासाठी  दि. २१/०७/२०१८ पासून सबंधित विभागाला तक्रारी दाखल केल्यानंतर सन-२०२० मध्ये एल थ्री कालव्यावर गट क्रमांक १६८ जमीनी मध्ये चुकीच्या ठिकाणी कालव्याच्या खालुन मोठे सिमेंटचे पाईप टाकून दोन्ही बाजूला १० दहा ते १२ फुटाचे टाके बनवून ४ चार ते ५ पाच लाख रुपये खर्च करून डिएचपीसी बनविण्यात आली मात्र त्याचा तिळमात्र काहीही उपयोग झाला नाही. चुकीच्या ठिकाणी डिएचपीसी बनविण्यात आल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सबंधित विभागाचे अधिकारी आहेत.

 त्याच प्रमाणे मासळ वितरिकेच्या एल -३ थ्री लघु कालव्याचे बांधकाम माती भरून करावयाचे होते. मात्र काव्यावर माती भरतांना तांत्रिक दृष्ट्या कालव्याचे लेवल बरोबर नसुन कालव्याच्या पारिवर कमी प्रमाणात मुरूम टाकल्या मुळे कालव्याच्या पारिवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.त्याच प्रमाणे कालव्याच्या पोटामध्ये मध्ये भागात एकही मुरूम टाकलेला नाही.व कालव्यातून शेतामध्ये पाणि जाण्यासाठी बनविलेल्या सिमेंटच्या गेटा ह्या चुकिच्या पध्दतीने बनविण्यात आल्या मुळे कालव्याच्या प्रत्येक गेटवर टिन आडवे करून पाणि द्यावे लागते. आणि गेट जमीनीच्या खाली असल्यामुळे उलट शेतातील पाणि कालव्यामध्ये वाहात जातो. 

यासाठी सबंधित विभागाला ४ चार वर्षापासून सतत तक्रारी करून सुध्दा आज पर्यंत  कोणतीही कार्यवाही न करता चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. व जानुन बुजून नुकसान केली आहे. आपल्यावर प्रकरण अलगट येवु नये म्हणून दोन वर्षानंतर तहसिलदार साहेब लाखांदूर यांना विनंती वजा अर्ज लिहुन अतिवृष्टीमुळे नुकसान झाली आहे तरी तहसिलकार्यालया मार्फत नुकसान देण्यात यावी. असे  गोसे खुर्द डावा कालवा येथील अधिकार्यांनी खोटे पत्रव्यवहार केले आहे. सदर शेतकऱ्यांची नुकसान हि अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे झाली आहे.

 हे माहित असुन सुद्धा हेतुपुरस्सर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पर्यंत नुकसान भरपाई न देता दरवर्षी नुकसान करण्याच्या उद्देशाने शासनाला अजून पर्यंत माहिती दिली नाही. तरी. सदर  प्रकरणाची सखोल चौकशी करून झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी.व दोषी अधिकार्यांनर कार्यवाही करण्याची मागणी  सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश नाकतोडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत