स्वराज्य बांधकाम कामगार संघटना शाखेचे उद्घाटन
स्वराज्य बांधकाम कामगार संघटना शाखेचे उद्घाटन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर, सिंदेवाही : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई बांधकाम कामगार नोंदणी चे स्वराज्य बांधकाम कामगार संघटना सिंदेवाही तालुका शाखा कार्यालयाचे उद्घाटन सोमवार ला करण्यात आले.
स्वराज्य बांधकाम कामगार संघटना यांचे वतीने नुकतेच सिंदेवाही तालुका शाखा कार्यालयाचे उद्घाटन डॉ. प्रदीपचंद्र बदनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नागरिक रत्नाकर बांगडे संस्थापक अध्यक्ष धनराज गेडाम प्रेमदास पौनीकर ,स्वाती पौनीकर, प्रमोद पौनीकर व इतर मान्यवर कार्यक्रम स्थळीउपस्थित होते.
या कार्यालय संस्थेचे वतीने अटल आहार योजना नोंदणीकृत कामगारांना मिळेल. कामगार नोंदणी 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार व या शिवाय आर्थिक, शैक्षणिक आरोग्य सामाजिक सुरक्षा अन्य योजनांचा लाभ मिळेल. इतरही कामाच्या बांधकामाच्या समावेश करण्यात आलेला आहे.कामगार नोंदणी तालुक्यातील स्वराज्य बांधकाम कामगार संघटना शाखेचे वतीने करण्यात येणार आहे . सिंदेवाही तालुका शाखा कार्यालय बांगडे निवास, नवीन बस स्थानक जवळ डॉ . बदनोरे यांचे दवाखान्याच्या बाजूला नवरगाव रोड सिंदेवाही येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत