आबाजी पाटील ढुमणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
आबाजी पाटील ढुमणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : सिंधी चे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे मा. श्री आबाजी पाटील ढुमणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विरुर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुलजी चव्हाण साहेब यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, विकास देवाळकर, अविनाश जेनेकर रामभाऊ ढुमणे, मंगेश रायपल्ले राजकुमार दामेलवार नरेंद्र देशकर भास्कर मोरे संजय ढुमणे संघर्ष दरेकर पिऊश झुरमुरे दाऊजी ठेंगरे गंगाराम जी ठेंगरे उपस्थित होते.
वयाच्या 81 व्या वर्षातही त्याच ऊर्जेने समाज कार्यात झोकून देणारे मा आबाजी पाटील ढुमने यांच्या वढदिवसानिमित्य हे दुसरे रक्तदान शिबिर होते या शिबिरात अनेक युवक परिसरातील नागरिक यांनी रक्तदान केले. या वेळी शासकीय रक्तपेढी संकलन केंद्र चंद्रपूरची चमू उपस्थित होती.
जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेचे पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पुर्व परिक्षेचे पुस्तक वाटप करण्यात आले या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत