काय ते खड्डे, काय तो रस्ता, काय तो जीवघेणा प्रवास,आणि अधिकारी मात्र ओके मध्येचआहे
काय ते खड्डे, काय तो रस्ता, काय तो जीवघेणा प्रवास,आणि अधिकारी मात्र ओके मध्येच आहे
रस्त्याची दुरवस्था, वाहतुकीचा अनेकदा खोळंबा; बांधकाम संथगतीने
नागरिक रस्त्याची व्यथा सांगणार कुणाला ?
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, राजुरा - गोवरी रस्त्याचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे, रस्त्यावर डांबरीकरण केले मात्र सततच्या पावसामुळे व वेकोलीच्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांचे अल्पावधीतच बारा वाजले आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले मात्र गोवरी-माथरा-रामपूर या परिसरातील काही बांधकाम अजूनही शिल्लक असताना जे डांबरीकरण झाले ते ही पूर्णपणे उखळून गेले आहे. करोडो रुपये किंमतीचे रस्त्याचे बांधकाम करीत असताना बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
रामपूर_माथरा_गोवरी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करू असे बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले.मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचे बांधकाम अपूर्ण असल्याने पावसाच्या दिवसात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस नसला तर धूळ आणि पाऊस पडला तर चिखल तुडवत नागरिकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. राजुरा - रामपूर- गोवरी_साखरी हा मुख्य मार्ग आहे.
या मार्गावर वेकोलितील कामगार,कर्मचारी,नागरिकांची दिवसरात्र वर्दळ असते.मात्र या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून अद्यापही पूर्ण झाले नाही. रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरु असल्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर असलेले छोटे पुल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.दोन पुलाच्या मधात दोन फुटाचे अंतर असल्याने अशा पुलात वाहन फसल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.त्यामुळे माथरा_गोवरी_पोवनी_साखरी मार्गावरील हे पुल वाहनधारकांसाठी जीवघेणे झाले आहे. या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे.
मात्र लोकप्रतिनिधीनी या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र काय ते खड्डे, काय तो रस्ता, काय तो जीवघेणा प्रवास,आणि अधिकारी मात्र ओकेमध्येच आहे. अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ सध्या राजुरा_रामपूर_गोवरी_पोवनी साखरी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर आली आहे.त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत