Breaking News

माझ्या आमदारकीमध्ये माझ्या माय भगिनी महिलांचा सिंहाचा वाटा आमदार निलेश लंके

 माझ्या आमदारकीमध्ये माझ्या माय भगिनी महिलांचा सिंहाचा वाटा आमदार निलेश लंके

भाळवणीत स्वातंत्र्य महोत्सव निमित्ताने महिला मेळावा

उडानच्या माध्यमातून महिला बचतगटांना कर्ज धनादेश वाटप

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण झाले असून मुलांच्या माध्यमातून त्यांना निश्चितच आर्थिक आधार दिला आहे परंतु दुसरीकडे माझ्या आमदारकीमध्ये माझ्या माय भगिनी महिलांचा सिंहाचा वाटा असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे. त्यामुळे या महिला बचत गटासाठी पारनेर तालुक्यात राज्यात आदर्श कार्यालय उभारण्यासाठी आमदारकीची ताकद उभी करणार असल्याचा मानस सुद्धा आमदार लंके यांनी बोलून दाखवला आहे.

  भाळवणी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वातंत्र्य महोत्सव निमित्ताने महिला मेळाव्यात दिपप्रज्वलन करताना आमदार निलेश लंके यांच्या सह तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे बबलू रोहकले राजेंद्र चौधरी सरपंच लीलाताई रोहकले सरपंच बापुसाहेब आवारी सुनिल कोकरे जिल्हा व्यवस्थापक सरोदे सर सोमनाथ जगताप साहेब उडदाच्या समन्वयक अलका कदम आशा चेमटे भारती चेमटे सविता तोडमल संचालक भाऊ साठे यांच्या उपस्थितीत महिला संघाला धनादेश वितरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.पारनेर तालुक्यात ना कारखाना किंवा इतर मोठे उद्योग आणण्यापेक्षा गोरगरीब व गरजू रुग्णांचे अश्रू पुसण्यासाठी अद्यावत रुग्णालय उभारण्याचे माझे स्वप्न आहे ते मी पुर्ण करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.उडान अभियान माध्यमातून  समुदाय गुंतवणूक निधी अंतर्गत ११ गटासाठी  ५ लाख रुपयां पर्यन्त एचडीएफशी बॅॱकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.

९५३ गट पारनेर तालुक्यात ४६ गावात ग्रामसंघ कार्यरत आहे.उमेद २०११ पासून हे अभियान चालु आहे.महिला बचत गटांचा माध्यमातून महिला उपजीविकेचे साधन व स्त्रोत जपणुकीसाठी ८४ लाख रुपये या उमेद अभियाना अंतर्गत वाटप करण्यात आले आहे.३४ गटांचे दोन ग्रामसंघ भाळवणीत जिल्हा व्यवस्थापक सरोदे सर आयोजन करण्यात आले होते.नागेश्वर व सिध्दी विनायक महिला व ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्यातील २० लाख महिला या उमेद अभियानांतर्गत जोडल्या गेलेल्या आहेत.७ .५० लाख रुपये कर्ज देवुन प्रक्रिया व्यवसाय उद्योग हे देण्यात आलेले आहे.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत महिला काम करत आहेत त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे काम पाहुन लाखो रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे.उमेदच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी आमदारकीची ताकद उभी करणार आहे .या महिलांसाठी राज्यात नाही असे कार्यालय उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक आदर्श वास्तु उभी करणार असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले. कष्टकरी व गरीब महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत दिली पाहिजे.९५३ बचत गटाच्या माध्यमातून ९ हजार ५०० महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले.या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.या महिलांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे.व्यक्तिगत जीवनात शैक्षणिक व इतर अडचणी आल्या तरी पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी महिलांना सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत