भीमाशंकर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस अधिकाऱ्यांची अरेरावी
भीमाशंकर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस अधिकाऱ्यांची अरेरावी
महा घडामोडी न्युज नेटवर्क,पुणे : श्रावणी सोमवार निमित आपत्ती व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करत भाविकांना दमदाटी करण्यात येत आहे. भाविकांना अर्वाच्या भाषेत बोलणी करून भाविकांच्या भावना दुखावण्यात येत आहेत, श्रावणी सोमवार निमित बाहेर राज्यातून तसेच शहरी भागातून मोठ्या प्रमाणात भाविकांची भीमाशंकर येथे पर्यटन विहार करण्यासाठी तसेच शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात खाजगी तसेच
वैयक्तिक वाहनांमधून येत असतात त्यातील प्रवाशांना, वाहकांना व्यवस्थित मार्गदर्शन न करता आपल्या पदाचा बडेजावपणा ( गैरवापर करत अर्वाच्य भाषेत बोलणी करून शासन व्यवस्थापनेला गालबोट लावण्याचे काम ते करत आहेत तरी उच्च अधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल योग्य मार्गदर्शन करून भीमाशंकर येथे येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना, वाहकांना योग्य पद्धतीची वागणूक द्यावी, अन्यथा पोलीस उपायुक्त कार्यालय येथे याची तक्रार दाखल करण्यात येईल असे येथील स्थानिक गावकरी करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत