मुली व महिलांसाठी स्व रक्षण शिबीर संपन्न
मुली व महिलांसाठी स्व रक्षण शिबीर संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : दि ०४/०८/२२ सावदा येथे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत मा.जलसंदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष दादा पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फडके साहेब, महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ शुभा पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महीला व मुली स्वयंमरक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेे.
त्याप्रसंगी सृष्टी मेमोरियल ट्रस्ट तर्फे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मुलींना व महिलांना आर्थिक मदत करण्यात आली तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत नयनाताई टेकवानी यांच्या तर्फे दहावीतुन व बारावी विज्ञान व कला विभागातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यीना रोख बक्षीस वितरण करण्यात आले त्याप्रसंगी आचार्य सुरेशराज मानेकर शास्त्री यांनी मार्गदर्शन केले सावदा पोलिस स्टेशनचे ए पि आय देविदासजी इंगोले साहेब यांनी मुलींनी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्रभाऊ चौधरी होते , प्रास्ताविक बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी केले कार्यक्रमचे सुत्र संचालन नंदु पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश अकोले यांनी केले मुलींना स्वरक्षणाचे प्रक्षिशण बि आनंद कुमार सर यांनी दिले या प्रसंगी उपस्थितांन मध्ये आं.ग.म.हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री सपकाळे सर, सृष्टी मेमोरियल ट्रस्ट च्या संचालिका प्रतिभा किशोर परदेशी,वर्षा संतोष परदेशी, भारतीय जनता पार्टी चे सावदा शहर अध्यक्ष जे के भाऊ भारंबे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश काका चौधरी, किशोर परदेशी, सरचिटणीस संतोष परदेशी, सरचिटणीस महेश अकोले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, युवा मोर्चा सावदा शहर अध्यक्ष सर्वेश लोमटे,तुषार चौधरी, पदाधिकारी कार्यकर्ते व शिक्षक शिक्षीका, विद्यार्थीनीं उपस्थितीत होते गार्गी रेवा बेडाळे या विद्यार्थ्यांनीने मिळालेली बक्षीसाची रक्कम आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी मुख्यध्यापक सपकाळे सर यांच्या कडे जमा केली.
त्याबद्दल तिचे कौतुक करण्यात आले सारीका चव्हाण यांनी तुम्ही मुली आमच्या परीवाराती आहात त्यामुळे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पण आमचीच आहे त्यामुळे अशा संरक्षण शिबीरातुन मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा लावण्याचे आवाहन केले, सृष्टी मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अशोकजी परदेशी यांनी या कार्यक्रमाला व भविष्यातील सामाजिक उपक्रमात मदतीचा हात देण्याचा मानस आहे असे प्रतिपादन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत